Manoj Jarange | 24 डिसेंबरच्या आत आम्हाला आमचं ठरलेलं आरक्षण पाहिजे – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्यामध्ये मोठं आंदोलन सुरू केलं. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र घ्यावं, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.

त्यानंतर ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी जालना जिल्ह्यात उपोषणाला सुरुवात केली. त्यांचं हे उपोषण हळूहळू संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं.

त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचं काम हाती घेतलं. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य शासनाला इशारा दिला आहे. 24 डिसेंबरच्या आत आम्हाला आमचं ठरलेलं आरक्षण पाहिजे, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी स्पष्ट केलं आहे.

Manoj Jarange commented on Maratha reservation

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. ते मिळवण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत.

यानंतर आम्हाला सरकारकडून जे काम अपेक्षित होतं ते सुरू आहे. आमच्या नोंदी असून देखील आम्हाला नाही म्हटलं जायचं. आंदोलनानंतर काही ठिकाणी 50 हजार नोंदी सापडल्या आहेत.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनुष्य वाढवून काम सुरू केलं, तर संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी सापडू शकतात. त्यामुळे हे काम करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावं, अशी माझी (Manoj Jarange) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे.

मराठवाड्यामध्ये मनुष्यबळ वाढवावं, कारण मराठवाड्यामध्ये आकडा वाढत नाहीये. मराठवाड्यामध्ये आकडा वाढत नाहीये, याचं कारण हे की त्या ठिकाणी अभ्यासकांची कमतरता आहे. टाईम बॉण्ड ठरल्याप्रमाणे शासनाने आम्हाला आरक्षण घ्यावं. आम्हाला 24 डिसेंबरच्या आत आमचं ठरलेलं आरक्षण पाहिजे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. या एकादशीच्या पूजेचा मान दरवर्षी उपमुख्यमंत्र्यांना मिळतो.

परंतु, मराठा समाजाने ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यास विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी एक मागणी केली आहे. यंदा कार्तिकी एकादशी पूजेचा मान मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मिळावं, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe