Maratha Reservation | महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार? कोल्हापुरात मराठवाड्यापेक्षा अधिक कुणबी नोंदणी आढळल्या

Maratha Reservation | कोल्हापूर: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यात मोठं आंदोलन उभारलं आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर (Maratha Reservation) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलं आहे. जिल्हा पातळीवर हे काम सुरू आहे.

अशात कोल्हापूर जिल्ह्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मराठवाड्यापेक्षा अधिक कुणबी नोंदी (Maratha Reservation) आढळून आल्या आहेत.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर (Maratha Reservation) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचं काम सुरू आहे. अशात कोल्हापूर जिल्ह्यात 5566 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

कागल व करवीर तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंदी आढळून आल्या आहेत. कागलमध्ये 1185 तर करवीरमध्ये 1104 कुणबी नोंदी सापडल्या आहे. हा आकडा मराठवाड्यापेक्षा अधिक असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Youth committed suicide for Maratha reservation

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यात अनेक तरुण आत्महत्या करताना दिसले आहे. मनोज जरांगे यांनी तरुणांना आत्महत्या थांबवण्याचं आवाहन केलं होतं.

परंतु तरी देखील हे सत्र सुरूच असल्याचं दिसून आलं आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) हिंगोली जिल्ह्यात एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे.

घरातील विजेच्या तारांना पकडून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मी मराठा समाजात जन्माला आलो, हा माझा गुन्हा आहे का? उच्च शिक्षित असून देखील नोकरी मिळत नाही, असं या तरुणाने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.