Sanjay Raut | निवडणूक आयोग म्हणजे भाजपच्या पिंजऱ्यातला पोपट – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट दोघांनीही पक्षाचं  नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? याबाबत आज सुनावणी होणार आहे. आज दुपारी चार वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे.

अशात या प्रकरणावर बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर खोचक शब्दात टीका केली आहे.

निवडणूक आयोग म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पिंजऱ्यातला पोपट असल्याचा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सीबीआय आणि ईडीप्रमाणे निवडणूक आयोग देखील भारतीय जनता पक्षाच्या पिंजऱ्यातला पोपट आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या (Sanjay Raut) बाबतीत जो निर्णय घेतला तो पूर्णपणे सरकारच्या दबावाखाली घेतला.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना. जिथे ठाकरे तिथे शिवसेना (Sanjay Raut) असं असताना एका फुटीर गटाच्या हाती निवडणूक आयोगाने शिवसेना दिली.

यातून निवडणूक आयोगाची नियत आणि बिघडलेलं चरित्र दिसून आलं आहे. अशात निवडणूक आयोगाकडे जाऊन काय न्याय मिळणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार हयात आहे, असं असताना त्यांचा पक्ष अजित पवारांना दिला जात आहे.”

Whose Nationalist Congress Party?

दरम्यान, दुपारी चार वाजता राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहे.

तर अजित पवार गटाकडून कुणीच उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात आहे. अशात ही सुनावणी नेमक्या कुणाच्या बाजूने होणार? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.