Shambhuraj Desai | संजय राऊतांनी कॅबिनेटसाठी वापरलेला गँगवॉर शब्द हास्यास्पद – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर खोचक शब्दात टीका केली आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्र्यांमध्ये गॅंगवॉर सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी कॅबिनेटसाठी वापरलेला गॅंगवॉर शब्द हास्यस्पद आहे, असं शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हटलं आहे.

We don’t take Sanjay Raut seriously – Shambhuraj Desai

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, “संजय राऊत यांना मंत्रिमंडळ बैठकीबाबत कोणी सांगितलं काय माहित? संजय राऊत यांचे जे खबरी आहे, जे त्यांना चुकीची माहिती देतात.

त्यामुळे संजय राऊत एखाद्या दिवशी अडचणीत सापडणार आहे. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये गँगवॉर सुरू आहे, असा हास्यस्पद शब्द संजय राऊत यांनी वापरला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असं काहीही घडलेलं नाही. राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वाद झाला हे जर संजय राऊत यांनी सिद्ध केलं तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

हसन मुश्रीफ यांच्या या भूमिकेशी मी (Shambhuraj Desai) शंभर टक्के सहमत आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला ही संजय राऊत यांची सवय आहे. त्यामुळे संजय राऊत मनाला येईल ते बोलत असतात. त्यांच्याकडे आम्ही (Shambhuraj Desai) कुणीच गांभीर्याने बघत नाही.”

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीवर बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला.

ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षासह कोणीच जुमानत नाही. कॅबिनेटमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा या मुद्द्यावरून गँगवॉर सुरू आहे.

एक मंत्री दुसऱ्या मंत्राच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत कॅबिनेटमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर नियंत्रण ठेवू शकत नाही तर मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही.

यापूर्वी राज्यामध्ये अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुद्द्यावर मौन बाळगून आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.