Sanjay Raut | ओबीसी विरुद्ध मराठा या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली दिसली आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. महाराष्ट्रात कमजोर दुर्बळ आणि अस्थिर सरकार बसत आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “राज्यामध्ये सध्या मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद सुरू आहे.

राज्याला जातीपातीमध्ये फोडण्याचा जो प्रयत्न आहे, तो सफल होताना दिसत आहे. कारण राज्यामध्ये कमजोर आणि अस्थिर सरकार बसलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोणी जुमानत नाही. भारतीय जनता पक्ष देखील मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही.”

Gangwar starts in cabinet over OBC vs Maratha issue – Sanjay Raut

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “ओबीसी विरुद्ध मराठा या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे. या विषयावरून कॅबिनेटमध्ये टोळी युद्ध सुरू आहे.

एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्यापर्यंत परिस्थिती कॅबिनेटमध्ये निर्माण झाली आहे. या राज्यामध्ये अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती.

अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवू शकत नसतील तर मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून बसण्याचा अधिकार त्यांना नाही. शंभूराजे देसाई काही बोलतात, तर छगन भुजबळ दुसरच काहीतरी बोलतात. तर एकनाथ शिंदे या मुद्द्यावर मौन बाळगून आहे.”

“मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. ही मुदत संपल्यानंतर महाराष्ट्रात काय होईल? याबाबत कोणीच काही सांगू शकत नाही.

मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर मुंबईचं नाक बंद करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांनी दिलेला इशारा मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतला नाही तर देशामध्ये महाराष्ट्राची बेअब्रू होईल”, असही त्यांनी (Sanjay Raut) म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.