Share

Dates Benefits | बदलत्या वातावरणात खजुराचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात उत्तम फायदे

Dates Benefits | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सर्वत्र दिवाळीची चाहूल लागली आहे. ऐन दिवाळीमध्ये वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहे. कुठे थंडी वाढताना दिसत आहे तर काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अशात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खजुराचा (Dates … Read more

Published On: 

Dates Benefits | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सर्वत्र दिवाळीची चाहूल लागली आहे. ऐन दिवाळीमध्ये वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहे.

कुठे थंडी वाढताना दिसत आहे तर काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अशात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खजुराचा (Dates Benefits) समावेश करू शकतात.

कारण खजुरामध्ये (Dates Benefits) आढळणारे पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, फॉस्फरस आरोग्यासाठी पोषक ठरू शकतात. या बदलत्या वातावरणात नियमित खजुराचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Dates Benefits)

हिवाळ्यामध्ये थंडीमुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे वाढत्या थंडीत ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही नियमितपणे खजुराचे (Dates Benefits) सेवन करू शकतात.

नियमित खजुराचे सेवन केल्याने शरीरातील विटामिन डी ची कमतरता दूर होते. त्याचबरोबर यामध्ये आढळणारे कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात. हिवाळ्यामध्ये नियमित तीन ते चार खजुराचे सेवन केल्याने तुमचे हाडे निरोगी राहू शकतात.

पचनक्रिया सुधारते (Improves digestion-Dates Benefits)

खजुरामध्ये (Dates Benefits) विरघळणारे फायबर आढळून येते, जे पचनाशी निगडित समस्या दूर करण्यास मदत करते. हिवाळ्यामध्ये नियमित खजुराचे सेवन केल्याने तुम्ही गॅस, ऍसिडिटी बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात.

त्यामुळे ज्या लोकांची पचन संस्था कमकुवत आहे, ते हिवाळ्यामध्ये दररोज तीन ते चार खजुराचे (Dates Benefits)  सेवन करू शकतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Dates Benefits)

या हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर तुमचे वजन नियंत्रणात आणायचे असेल तर खजूर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. खजुरामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज आढळतात आणि फायबरचे प्रमाण जास्त आढळते.

त्याचबरोबर खजुराचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, परिणामी तुम्ही अधिक खाणं टाळतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खजुराचा समावेश करू शकतात.

Chance of rain in the state

दरम्यान, राज्यात एकीकडे थंडीची चाहूल लागत असताना अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

10 नोव्हेंबर पर्यंत दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अशात या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही नियमित सकाळी दोन ते चार खजुराचे सेवन करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही