Shubman Gill | टीम महाराष्ट्र देशा: सध्या सुरू असलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे.
या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत 8 सामने खेळलेले असून सर्व सामने जिंकत या स्पर्धेमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. अशात आयसीसीने टीम इंडियातील युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याला जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून घोषित केलं आहे.
या यादीमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानी होता. त्याला मागे टाकत शुभमन गिल (Shubman Gill) प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे.
Shubman Gill performed brilliantly in all three formats of cricket
शुभमन गिलने (Shubman Gill) क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्ये त्याने उत्तम खेळी खेळली आहे.
त्यानंतर तो (Shubman Gill) आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 830 गुणांसह पहिला स्थानावर विराजमान झाला आहे. तर या यादीत 824 गुणांसह बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे.
टीम इंडियातील सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीनंतर शुभमन गिल (Shubman Gill) हे स्थान गाठणारा चौथा फलंदाज ठरला आहे.
दरम्यान, फलंदाजांसह भारतीय संघातील गोलंदाजांनी देखील आयसीसी रँकिंगमध्ये उत्तम स्थान पटकावलं आहे. आयसीसी बॉलिंग रँकिंगमध्ये देखील भारतीय संघाचा बोलबाला आहे.
या यादीत प्रथम क्रमांकवर टीम इंडियातील मोहम्मद सिराज विराजमान आहे. तर या यादीमध्ये भारतीय संघाचा कुलदीप यादव चौथ्या क्रमांकावर आहे तर जसप्रीत बुमराह आठव्या स्थानावर विराजमान आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी या यादीत दहाव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेच्या भेटीला; मराठा-ओबीसी वादानंतर सरसकट आरक्षण मिळणार कि नाही यावर चर्चा
- Maratha Reservation| मराठा समाजाचा फडणवीस आणि अजित पवारांना दणका; कार्तिकी पूजेला निमंत्रण न देण्याचा मंदिर समितीचा निर्णय
- PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यात शेतकऱ्यांना 2 हजार ऐवजी 3 हजार रुपये मिळणार? पाहा अपडेट
- Govt Job Opportunity | आयकर विभागात नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर
- Chitra Wagh | महिलांचा अपमान करणाऱ्या नितीशकुमारांच्या गलिच्छ मनोवृत्तीचा निषेध – चित्रा वाघ