Chitra Wagh | महिलांचा अपमान करणाऱ्या नितीशकुमारांच्या गलिच्छ मनोवृत्तीचा निषेध – चित्रा वाघ

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी काल (7 नोव्हेंबर) विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करत असताना खळबळजनक विधान केलं आहे.

एखाद्या मुलीने शिक्षण पूर्ण करून लग्न केलं तर पुरुष रोज रात्री संबंध निर्माण करतात. त्यानंतर मूल जन्माला येतं. मात्र मुलगी जर साक्षर असली तर प्रजनन दर घसरतो.

मुलगी साक्षर असली तर प्रजनन दर साधारण 2 टक्के खाली येतो. तर मुलीचं शालेय शिक्षण पूर्ण झालेलं असेल तर प्रजनन दर राष्ट्रीय स्तरावर 1.7 टक्क्यांने घसरतो, असं नितीश कुमार यांनी म्हटलं.

त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महिलांचा अपमान करणाऱ्या नितीशकुमारांच्या गलिच्छ मनोवृत्तीचा निषेध, असं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटलं आहे.

Nitish Kumar’s dirty attitude towards women was seen – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “वर्तनावरून राजकारण्याची मनोवृत्ती दिसून येते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची स्त्रियांविषयीची गलिच्छ मनोवृत्ती काल दिसून आली.

याला कारणीभूत होते त्यांचे विधिमंडळातील वर्तन, सभ्यतेचे सर्वोच्च निकष पाळण्याची अपेक्षा विधिमंडळ सदस्यांकडून केली जाते. त्यात सभागृह नेत्याकडून तर अधिकच अपेक्षा असतात.

पण, काल नितिशकुमारांनी स्त्रियांबद्दल बोलताना कमालीची गलिच्छ भाषा वापरली. ती इतकी घाणेरडी होती की, त्यांच्या महिला सहकाऱ्यांनासुद्धा शरमेने तोंड लपवावे लागले.

समस्त महिलावर्गाच्या अब्रूचे निघणारे धिंडवडे पाहून एका आमदार भगिनीला रडू कोसळलं. चारचौघांतही कुणी बोलणार नाही असे थेट विधिमंडळाच्या व्यासपीठावरून मिटक्या मारत बोलणाऱ्या नितिशबाबूनी आपले खरे चरित्र या निमित्ताने दाखवून दिले.

त्यांनी स्वत:चीच लाज काढली. राज्याचा मुख्यमंत्रीच जर इतकं अभद्र बोलत असेल तर त्या राज्यातल्या महिलांच्या परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी ! महिलांचा अपमान करणाऱ्या नितीशकुमारांच्या गलिच्छ मनोवृत्तीचा निषेध..!!

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.