Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मोठा लढा उभारला आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.
त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. या उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालवली होती.
त्यामुळं उपोषण मागे घेताच त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या ते त्या ठिकाणी उपचार घेत आहे.
अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान ते मनोज जरांगे यांची भेट घेणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Will Devendra Fadnavis meet Manoj Jarange?
मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना अनेक नेते त्यांच्या भेटीसाठी उपोषण स्थळी दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील त्यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये गेले होते.
परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांना भेटण्यासाठी गेले नव्हते. यावरून मनोज जरांगे अनेकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना दिसले होते.
अशात मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील आज या शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जरांगे यांची भेट घेणार का? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, तब्बल नऊ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं.
उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य सरकारने जरांगे यांना मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. परंतु, जरांगे यांनी ही मुदत देण्यास थेट नकार दिला.
त्यानंतर त्यांनी राज्य सरकारला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. राज्य शासन 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देईल, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | हिंदुत्व संकटात आले म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिता येईल का? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Weather Update | राज्यात कुठं थंडी तर कुठं पावसाची शक्यता; वाचा हवामान अंदाज
- Maratha Reservation | भुजबळांमुळे अजित पवारांची बारामतीत होणार गोची? भुजबळांच्या विधानानंतर मराठा क्रांती मोर्चाने पवारांना घेरलं
- Maratha Reservation | ओबीसीमधील इतर वंचित जातींच्या नोंदी तपासाव्यात; विजय वडेट्टीवारांची CM शिंदेंना मागणी
- Maratha Reservation | भुजबळ-जरांगे वाद पेटणार? मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज उतरला रस्त्यावर