Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.
त्यानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवला आहे.
छगन भुजबळ यांच्यानंतर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या गोष्टीला विरोध केला आहे. महाराष्ट्रातील कुणबी जातीची नोंद शोधत असताना इतर मागासवर्ग संवर्गात समाविष्ट सर्व जातीची नोंद शोधून श्वेतपत्रिका प्रकाशित करा, अशी मागणी विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) केली आहे.
Give Kunbi certificate to Maratha community in Marathwada
“मनोज जरांगे यांनी सुरुवातीला मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी ही मागणी केली.
यामध्ये मराठवाडा विभाग सोडून इतर विभागातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील पुरावे शोधणे हे सध्या तरी इतर मागासवर्गीय प्रवर्गावर होणारा अन्याय वाटतो अशी इतर मागासवर्ग समाजाची धारणा आहे.
सद्यस्थितीत इतर मागासवर्ग प्रवर्गात 373 जाती येतात. त्या सर्व व्यक्तींना आणि कुटुंबांना सुद्धा संबंधित कार्यालयातून सन 1967 च्या पूर्वीच्या पुराव्यांची नोंद शोधण्याकरिता खूप मानसिक व आर्थिक त्रास होतो.
त्यामुळे इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या लाभांपासून अनेकांना वंचित राहावे लागते. त्यामुळं महाराष्ट्रातील कुणबी जातीची नोंद शोधत असताना इतर मागासवर्ग संवर्गात समाविष्ट सर्व जातीची नोंद शोधून श्वेतपत्रिका प्रकाशित करा, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा समाजानंतर ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, अशी भूमिका ओबीसी समाजाने स्पष्ट केली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाने मोर्चा काढला. या मोर्चामध्ये ओबीसी समाज हजारो संख्येने सामील झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | भुजबळ-जरांगे वाद पेटणार? मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज उतरला रस्त्यावर
- Maratha Reservation | भुजबळांच्या दबावामुळे राज्याचं शिष्टमंडळ झुकलं? जरांगगेंसोबत आज होणारी भेट ढकलली उद्यावर
- Chitra Wagh | आपली पार वाताहात झाली, हे कटू सत्य राऊतांना मान्य नाहीये; चित्रा वाघांचं राऊतांना प्रत्युत्तर
- Maratha Reservation | भुजबळांच्या विरोधानंतर मराठा आरक्षणावर PM मोदी तोडगा काढणार? पंतप्रधानांच्या दरबारी जनतक्रार याचिका दाखल
- Maratha Reservation | आज होणारी भेट उद्यावर ढकलली; राज्य शासनाचं शिष्टमंडळ उद्या जरांगेंना भेटणार