Share

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: मराठा समाजाला आता ओबीसींप्रमाणे मिळणार ‘या’ ८ योजनांचा थेट लाभ

राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ओबीसी धर्तीवर ८ नव्या शैक्षणिक योजना आणि शुल्कात सवलती लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Published On: 

Maratha reservation benefits and education scheme announcement by Maharashtra government

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सातत्याने मोठे घमासान सुरू असतानाच, आता मराठा समाजाच्या पदरात नेमकं काय पडणार, असा थेट प्रश्न विचारला जात होता. याच प्रश्नावर तोडगा काढत राज्य सरकारने एक मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे.

सरकारने मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला गती देण्यासाठी तब्बल ८ योजना जाहीर केल्या आहेत. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापुढे इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा मिळतात, त्याच धर्तीवर आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही थेट लाभ दिला जाणार आहे.

Maratha Reservation Benefits

या ऐतिहासिक निर्णयामुळे उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील हजारो तरुणांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती’ दिली जाईल. तसेच, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती’ आता मराठा प्रवर्गासाठीही खुली करण्यात आली आहे.

दुसरीकडे, तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना नव्याने सुरू करण्यात येत आहे. याशिवाय, सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि एकूण १६ प्रकारच्या शैक्षणिक शुल्काची शासनाकडून थेट प्रतिपूर्ती (Reimbursement) केली जाणार आहे.

सर्वात मोठा बदल म्हणजे, जे मराठा विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत पण परराज्यातील अनुदानित किंवा विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतील, त्यांनाही या योजनेचा फायदा घेता येईल. ‘कॅप’ (CAP) राऊंडनंतर रिक्त राहिलेल्या किंवा संस्था पातळीवरील (Institutional Level) प्रवेशांसाठीही ओबीसींप्रमाणेच सर्व सवलती लागू राहतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

भविष्यात ओबीसी प्रवर्गासाठी सरकारने कोणतीही नवीन शैक्षणिक योजना आणल्यास, ती कोणत्याही नव्या सरकारी आदेशाची वाट न पाहता मराठा समाजाला आपोआप लागू होणार आहे. त्यामुळेच हा निर्णय मराठा समाजाच्या शैक्षणिक वाटचालीत मोठा आधार ठरणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही