Maratha Reservation | भुजबळांमुळे अजित पवारांची बारामतीत होणार गोची? भुजबळांच्या विधानानंतर मराठा क्रांती मोर्चाने पवारांना घेरलं

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध दर्शवला आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे मागच्या दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखं आहे, असं खळबळजनक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना धारेवर धरलं आहे.

Ajit Pawar should clarify his position regarding Chhagan Bhujbal

छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

छगन भुजबळ यांच्यावर टीका करत असताना त्यांनी अजित पवार यांना देखील धारेवर धरलं आहे. ते म्हणाले, “छगन भुजबळ यांनी जर दोन समाजामध्ये वाद निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गाठ मराठा समाजासोबत आहे.

छगन भुजबळ यांना ज्या पक्षाने मोठं केलं, त्या पक्षाच्या अजित पवारांना आमचं जाहीर आवाहन आहे की, त्यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर बारामतीतील मराठे तुम्हाला तुमची जागा दाखवतील. अजित पवारांनी त्वरित छगन भुजबळ यांना त्यांच्या पक्षातून काढायला हवं.”

दरम्यान, मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन सुरू केलं होतं. अशात मराठा समाजानंतर ओबीसी समाजाने जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं आहे.

मराठा समाजाला आम्ही ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, अशी भूमिका ओबीसी समाजाने स्पष्ट केली आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने घनसावंगी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe