Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सर्वत्र गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. वाढत्या थंडीमुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.
अशात राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी येत्या 48 तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
A low pressure area has formed in the Arabian Sea
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचबरोबर वेस्टन डिस्टर्बन्स सक्रिय असल्यामुळे राज्यात पुढील 48 तास पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे.
राज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे. त्याचबरोबर तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान, देशाच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) आहे. तर उत्तर भागांमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Weather Update) आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये आज पासून पाऊस आणि हिमवर्षाव सुरू होणार होणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर उत्तराखंडमध्ये 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मध्य आणि पूर्व भारतामध्ये हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
Benefits of Warm Water
सध्या देशातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन करू शकतात.
नियमित सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर तुम्ही सर्दी, खोकला, घसा दुखी यासारख्या आजारांपासून दूर राहू शकतात.
दररोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, पचन संस्था मजबूत राहते आणि पोट देखील चांगले साफ होते.
त्यामुळे या बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी कोमट रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन केले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | भुजबळांमुळे अजित पवारांची बारामतीत होणार गोची? भुजबळांच्या विधानानंतर मराठा क्रांती मोर्चाने पवारांना घेरलं
- Maratha Reservation | ओबीसीमधील इतर वंचित जातींच्या नोंदी तपासाव्यात; विजय वडेट्टीवारांची CM शिंदेंना मागणी
- Maratha Reservation | भुजबळ-जरांगे वाद पेटणार? मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज उतरला रस्त्यावर
- Maratha Reservation | भुजबळांच्या दबावामुळे राज्याचं शिष्टमंडळ झुकलं? जरांगगेंसोबत आज होणारी भेट ढकलली उद्यावर
- Chitra Wagh | आपली पार वाताहात झाली, हे कटू सत्य राऊतांना मान्य नाहीये; चित्रा वाघांचं राऊतांना प्रत्युत्तर