Weather Update | तापमानात पुन्हा घसरण, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात अनेक ठिकाणी वातावरणात (Weather) चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी थंडी (Cold) चा कडाका वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरत चालला आहे. नंदुरबारमध्ये वर्षातील सर्वात कमी म्हणजे 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

राज्यामध्ये थंडीचा जोर वाढला आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. शेतीतील गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांवर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या वाढत्या थंडीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आज सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात घट झाल्यामुळे जनसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर या वाढत्या थंडीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

दरम्यान पुणे, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र देखील चांगलाच गारठला आहे. त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये देखील थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.