Share

Manisha Kayande | “होता वशिला म्हणून गाता आलं म्हशीला” – मनीषा कायंदे

🕒 1 min read Manisha Kayande | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. ‘अज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झालंय. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Manisha Kayande | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. ‘अज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झालंय.

काहींनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले तर काहींनी त्यांना ट्रोल केले. अशातच  शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. “होता वशिला म्हणून गाता आलं म्हशीला”, अशा आशयाची पोस्ट करत मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना डिवचलं आहे.

दरम्यान, नवीन प्रदर्शित झालेल्या या गाण्याविषयी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘मला खूप आनंद होत आहे कारण लोकांना गाणे आवडले, त्यांनी ते स्वीकारले. अनेकजण त्याचे रिल्स करत आहेत. माझा विश्वास आहे. कोणीही काही बोलले तरी काम करत राहिले पाहिजे.’

अमृता फडणवीस यांचे हे नवे गाणे ‘टी सीरिज’ बॅनर खाली बनवण्यात आले आहे. या गाण्यातील त्यांचा लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या लूकमध्ये त्यांनी जीन्स, टॉप व जॅकेट परिधान केले आहे. या लूकवर त्यांनी हटके फॅशन ज्वेलरी परिधान केली आहे. त्यांच्या हा स्टायलिश लूक पाहून सर्वांचे लक्ष वेधले. आता, त्यांचा लूक पाहून नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या