🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काल एका सभेत बोलताना मोठं विधान केलं. ‘भाजपाने शिवसेना फोडण्यासाठी ‘ऑपरेशन’ राबवलं’, असं गिरीश महाजन म्हणाले. यानंतर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
“गिरीश महाजन यांच्या बोलण्यावरून एक स्पष्ट झाले आहे, भारतीय जनता पक्षाचे जुनं स्वप्न होतं, शरद पवार यांचे स्वप्न नव्हतं. ते भारतीय जनता पार्टीचे होतं, त्यांच्या जे पोटात होतं ते ओठावर आले. त्यामुळे गिरीश महाजन यांचं मी अभिनंदन करेल”, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटले आहे.
“भाजपाला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. त्याआड शिवसेना येऊ शकते म्हणून ते आधी शिवसेनेचे तुकडे करत आहेत. हेच भाजपाचे राष्ट्रीय धोरण आहे. हे आमच्या खोकेबहाद्दर ४० आमदारांना कळालं नाही. अशाप्रकारे ते महाराष्ट्राबरोबर बेईमानी करण्याच्या कटात सामील झाले आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
गिरीश महाजन म्हणाले, “हे खरं आहे की, आम्ही शिवसेनेमधील ‘ऑपरेशनला’ सुरुवात केली होती, पण यात यश येईल यावर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र, एकनाथ शिंदे बाहेर निघाले आणि पुढे गेले. बघताबघता सर्व सैन्य त्यांच्यामागे गेलं. शेवटी जमलं. झालं एकदाचं.”
महत्वाच्या बातम्या :
- Gopichand Padalkar | “माझी औकात काढणाऱ्यांना मी बारामतीत जाऊन…”; पडळकर नेमकं काय म्हणाले?
- Ajit Pawar | “पडळकरांच्या टीकेला उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही”; दादांची स्पष्ट भूमिका
- Ravi Rana | “अरविंद सावंत यांच्या टीकेला गंभीरतेने घेण्याची गरज नाही”; रवी राणांचा खोचक टोला
- Jasprit Bhumrah | टेस्ट मॅच महत्वाची की IPL?, बुमराहने ‘या’ कसोटीतून घेतली माघार
- Ambadas Danve | “जज साहब तारीख तो मिल रही पर इंसाफ…”; अंबादास दानवे यांची सत्तासंघर्षावर खोचक प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now