Share

Ravi Rana | “अरविंद सावंत यांच्या टीकेला गंभीरतेने घेण्याची गरज नाही”; रवी राणांचा खोचक टोला

Ravi Rana | अमरावती : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले.  शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे.

अशातच उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून मशाल यात्रा काढण्यात आली. त्यावेळी खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी रवी राणा यांच्यावर जातप्रमाण पत्रावरून टीका केली होती. त्या टीकेवर रवी राणा यांनी जोरदार पलटवार केला आहे.

“अरविंद सावंत यांनी काल जो मोठा पराक्रम केला त्यावेळी मोजून ३५ ते ४० लोक होते. या मूठभर लोकांच्या समोर एका खासदाराने बोलावं अशी त्यांची गत झाली आहे. अरविंद सावंत यांच्या टीकेला गंभीरतेने घेण्याची गरज नाही”, असा खोचक टोला रवी राणा यांनी अरविंद सावंत यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते अरविंद सावंत?

“गोरा गोमटा वरवंटा लोक रंगाला बघून बोलतात, हा वरवंटा सगळ्यांच्या डोक्यावरून फिरतो, तरी कुणाला कळत नाही. जात प्रमाणपत्र खोटे असतानाही अजूनही अटक झाली नाही, शेवटी कोर्टाने पोलिसांना विचारले तुम्ही मॅनेज झालात का? हे दुर्दैवच आहे.”

महत्वाच्या बातम्या :

Ravi Rana | अमरावती : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले.  शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now