Chitra Wagh | आपली पार वाताहात झाली, हे कटू सत्य राऊतांना मान्य नाहीये; चित्रा वाघांचं राऊतांना प्रत्युत्तर

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: काल राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांकवर विराजमान झालेला दिसला आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर खोचक शब्दात टीका केली. राज्य अनाडी लोकांच्या हाती गेला असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपली पार वाताहात झाली, हे कटू सत्य राऊतांना मान्य नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Gram panchayat results have shown who is clumsy and who is a player – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “राज्यात कोण अनाडी आणि कोण खिलाडी, हे ग्रामपंचायत निकालांनी दाखवून दिलंय. आपली पार वाताहात झाली, हे कटू सत्य तुम्हाला मान्य करायचं नाहीये.

त्यामुळे काळ मोठा कठीण आलाय तो तुमच्यासाठी. एकट्या सिनेटचंच काय घेऊन बसलात? काळजी करू नका, निवडणूक आयोग सगळ्याच निवडणुका घेईल. सिनेटपासून संसदेपर्यंत सगळीकडे कमळच फुलेल, याची तुम्ही खात्री बाळगा.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावरून भारतीय जनता पक्षावर टीका केली. “काळ मोठा कठीण आला आहे. राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे.

ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत. या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे.

जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात. मुंबईसह 14 महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते. ते ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच!”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.