Share

Chitra Vagh & Urfi Javed | चित्रा वाघ उर्फी जावेद वादावर मोठी बातमी; भाजपकडून…

🕒 1 min read Chitra Vagh & Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपने नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांच्यामध्ये वाद-विवाद सुरू होता. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार केली होती. हा वाद भाजपतील वरिष्ठ नेत्यांना फारसा रुचलेला नसल्याचे दिसून आले आहे. कारण त्यांनी या वादाचे समर्थन … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chitra Vagh & Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपने नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांच्यामध्ये वाद-विवाद सुरू होता. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार केली होती. हा वाद भाजपतील वरिष्ठ नेत्यांना फारसा रुचलेला नसल्याचे दिसून आले आहे. कारण त्यांनी या वादाचे समर्थन केलेले नाही. पोलीस उर्फीला अटक का करत नाही? असा जाहीर प्रश्न चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर उपस्थित केला आहे. यानंतर चित्रा वाघ या वादामध्ये एकाकी पडल्याचे दिसून आले आहे. उर्फीने स्त्री म्हणून काहीही वागवे केले नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली होती. या प्रतिक्रिया नंतर हा वाद संपण्याची चिन्हे दिसत आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. उर्फीचा नंगा नाच चालू देणार नाही असा इशारा देखील चित्रा वाघ यांनी केला होता. त्यांनी उर्फी विरोधात पोलीस तक्रार देखील केली होती. मात्र, पोलीस उर्फीवर कारवाई करत नसल्याने आणि उर्फी त्यांना रोज डिवचत असल्याने चित्रा वाघ संतापल्या आहे. चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यामध्ये ट्विटरवर युद्ध सुरूच आहे. उर्फी ट्विट करत सारखं चित्रा वाघ यांना डिवचत आहे. तिने नुकतेच तिच्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांना ‘माझी सासू’ असा उल्लेख केला होता.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना पोलीस या विषयावर कारवाई करत नाही. यावरून असे स्पष्ट होत आहे की त्यांनाही हा वाद नापसंद आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीस यांनी जाहीरपणे उर्फिने काही वावगे केलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येकाची वेगवेगळी मत असू शकतात, त्यामुळे चित्रा वाघ यांनी त्यांची मत मांडले आहे. उर्फी जावेद हे सगळं आपल्या करिअरसाठी करते, त्यात तीच काही चुकीचं करत नाही. असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या मतानंतर चित्रा वाघ यांची चांगलीच पंचायत झाली आहे. भाजप नेते या वादाला समर्थन देत नसल्याचे जाहीरपणे दिसून येत आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांना हा वाद संपवावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Marathi News

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या