Share

Manoj Jarange | आम्ही ओबीसींच आरक्षण मागत नाही किंवा हिसकावून घेत नाहीये – मनोज जरांगे

Manoj Jarange | छत्रपती संभाजीनगर: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत चर्चेत आहे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठ्यांनी केली आहे. मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजानं विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, अशी भूमिका ओबीसी समाजाने स्पष्ट केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj … Read more

Published On: 

Manoj Jarange | छत्रपती संभाजीनगर: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत चर्चेत आहे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठ्यांनी केली आहे.

मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजानं विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, अशी भूमिका ओबीसी समाजाने स्पष्ट केली आहे.

याच पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ओबीसींचं आरक्षण मागत नाही किंवा हिसकावून घेत नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Manoj Jarange commented on Maratha reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “ओबीसी समाज एकत्र आला किंवा नाही आला तो वेगळा विषय आहे.

मात्र, मराठा समाजाचे पुरावे सापडत असले तर त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागेल. आम्ही ओबीसी समाजाचं आरक्षण मागत नाही किंवा हिसकावून घेत नाही.

आमचं ओबीसीमध्ये असलेलं आरक्षण आम्ही घेत आहोत. सत्य असल्यामुळे सरकार आम्हाला हे आरक्षण देत आहे. आम्ही पूर्वीपासून कुणबी असल्याच्या नोंदी आमच्याकडे आहे, त्यामुळे सरकार आम्हाला हे आरक्षण देत आहे.

आमच्याकडे पुरावे आहेत, म्हणून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे आणि ही गोष्ट गावागावातील सर्व धर्मांना मान्य आहे. फक्त नेतेच आमच्या या आरक्षणाला विरोध करत आहेत.

ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचं काम ओबीसी नेते करत आहे, असं गावागावातील ओबीसी बांधव म्हणतं आहे.”

दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना अनेक नेते त्यांच्या भेटीसाठी उपोषण स्थळी दाखल झाले होते.

यादरम्यान मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपोषण स्थळी येण्याची विनंती केली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस गेले नव्हते.

अशात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे (Manoj Jarange) देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. अशात देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांची भेट घेणार का? अशा चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही