Share

Bacchu Kadu | अभ्यास असताना छगन भुजबळ मराठा आरक्षणावर असं बोलतात म्हणजे नवलच; बच्चू कडूंनी भुजबळांचे कान टोचले

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट पूर्वी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणं म्हणजे मागच्या दारानं आरक्षण देण्यासारखं आहे, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं … Read more

Published On: 

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट पूर्वी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

त्यांच्या या मागणीला ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणं म्हणजे मागच्या दारानं आरक्षण देण्यासारखं आहे, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bacchu Kadu commented on Maratha reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “मराठा हा समूहवाचक शब्द आहे. मराठा हा काही एका जातीचा शब्द नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी अभ्यास असताना अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे नवलच आहे.

माझ्या वडिलांच्या टीसीवर मराठा नोंद होती. परंतु माझी (Bacchu Kadu) पूर्वी कुणबी नोंद असल्यामुळे मी (Bacchu Kadu) कुणबी आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील मराठे कुणबी झाले. त्यामुळे मराठवाड्यातील मराठे कुणबी नाही, हे म्हणणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. मराठा हे कुणबीच आहे आणि हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.”

Manoj Jarange commented on Maratha reservation

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाचे पुरावे सापडत आहे. त्यामुळे त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे.

आम्ही ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेत नाही. त्याचबरोबर आम्ही त्यांचं आरक्षण मागत नाही. ओबीसीमध्ये असलेलं आमचं आरक्षण आम्ही घेत आहोत.

पूर्वीपासून आम्ही कुणबी असल्याच्या नोंदी आमच्याकडे आहेत, त्यामुळे सरकार आम्हाला हे आरक्षण प्रदान करत आहे. ही गोष्ट गावागावातील सर्व धर्मांना मान्य आहे. फक्त ओबीसी नेते आमच्या आरक्षणाला विरोध करताना दिसत आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही