Amruta Fadanvis | उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Amruta Fadanvis | मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वादविवाद सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांनी तिच्या विरोधात पोलीस तक्रार देखील केली होती. त्यांच्या या कृतीला उत्तर देत उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. उर्फी ने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना चांगलचं डीवचलं आहे.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वाद सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या आहे, “उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करत आहे त्यात मला काहीही वावगं वाटतं नाही.” प्रसार माध्यमांशी बोलत असताना अमृता फडणवीस यांनी त्यांचा मत व्यक्त केलं.

पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “काहींची व्यावसायिक गरज असते, म्हणून त्यांना त्या प्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही फक्त पब्लिसिटी मिळावी म्हणून रस्त्यावर तसं फिरत असाल, तर ते चुकीचं आहे. उर्फी एक कलाकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी तिने आपली संस्कृती जपली पाहिजे. प्रत्येकाने आपलं व्यावसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगवेगळे ठेवायला पाहिजे.”

या मुद्द्यावर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. चित्रा वाघ यांनी त्यांची विचार मांडले आहेत. त्यानुसार त्या कारवाई देखील करत आहे. मला असं वाटतं, जिथे उर्फीला प्रोफेशनल कमिटमेंट नाही तिथे तिने संस्कृतीच्या हिशोबाने राहिला पाहिजे. ती जे काय करते ते स्वतःसाठीच करते. यामध्ये मला काहीच वावगं वाटत नाही, असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या