Jasprit Bhumrah | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याआधीच जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) माघार घेतली. दुखापतीनंतर तो या मालिकेमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र, मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी तो संघातून बाहेर पडला आहे. त्याला आधी या संघामध्ये सामील करण्यात आले नव्हते. 3 जानेवारी रोजी त्याला संघात स्थान मिळाले होते. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत तो पुन्हा संघातून बाहेर पडला.
एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये बुमराहची संघात निवड होणार नाही, अशी माहिती एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईटस्पोर्ट्सला दिली आहे. ते म्हणाले आहे, “बुमराहची न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघात निवड केली जाणार नाही. तो आयपीएलला देशापेक्षा जास्त प्रधान्य देत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.”
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “बुमराह न्यूझीलंडविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये अनुपस्थित राहू शकतो. त्याचबरोबर तो बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील चारही कसोटी खेळू शकेल की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, “न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. कारण तो यापुढे त्याच्या पुनर्वसनावर काम करणार आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारे कसोटी मालिकेसाठी तयार आहे की नाही, याबद्दल आता काही सांगता येणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve | “जज साहब तारीख तो मिल रही पर इंसाफ…”; अंबादास दानवे यांची सत्तासंघर्षावर खोचक प्रतिक्रिया
- Ajit Pawar | राष्ट्रवादीत अमोल कोल्हे नाराज? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले…
- IND vs SL | इशान किशनला संघात स्थान न दिल्याने माजी खेळाडू संतापला, म्हणाला…
- Sanjay Raut | “सरकारमधल्या अतिशहाण्या मंत्र्यांनी कान कोरून…”; मुनगंटीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार
- Rose Water | हिवाळ्यामध्ये गुलाब जलाने चेहरा कसा स्वच्छ करायचा?, जाणून घ्या पद्धती