Share

Maratha Reservation| मराठा समाजाचा फडणवीस आणि अजित पवारांना दणका; कार्तिकी पूजेला निमंत्रण न देण्याचा मंदिर समितीचा निर्णय

Maratha Reservation | पंढरपूर: 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. या एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होती.

मात्र, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे पूजा कोणाच्या हस्ते होणार? असा सवाल मंदिर समिती समोर उपस्थित झाला होता.

या पूजेचं अजित पवारांना (Ajit Pawar) निमंत्रण दिलं तर देवेंद्र फडणवीस नाराज होतील आणि देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं तर अजित पवारांवर अन्याय होईल, अशा चर्चा सुरू होत्या.

तर दुसरीकडे त्याचबरोबर मराठा समाजाने आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यास विरोध केला होता. अशात मंदिर समितीने यावर तोडगा काढला आहे.

कार्तिकी एकादशीच्या तयारी संदर्भात आज मंदिर समितीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. कार्तिकी एकादशीची पूजा कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार?

हा प्रश्न या बैठकीमध्ये सोडवण्यात आला आहे. यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीमध्ये कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला न बोलवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

The temple committee decided not to invite the Deputy Chief Minister

दरम्यान, आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला होता. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात येऊ देणार नाही अशी भूमिका अनेक गावकऱ्यांनी स्पष्ट केली होती.

याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने (Maratha Reservation) कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा होऊ देणार नसल्याचं म्हटलं होतं. कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असं मराठा समाजाने स्पष्ट केलं होतं.

अशात कार्तिकी पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मंदिर समितीने हा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

Maratha Reservation | पंढरपूर: 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. या एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now