Share

Chhagan Bhujbal | जरांगेंना सर्व प्रकारचं आरक्षण पाहिजे, ते पण त्यांना त्यांच्या पद्धतीने हवं; भुजबळांच्या विधानानंतर मराठा समाज आक्रमक होणार?

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण व्हावी, यासाठी त्यांनी महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभारलं आहे. अशात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांच्या या मागणीला विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून … Read more

Published On: 

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे.

ही मागणी पूर्ण व्हावी, यासाठी त्यांनी महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभारलं आहे. अशात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांच्या या मागणीला विरोध दर्शवला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देणं म्हणजे मागच्या दारातून आरक्षण देण्यासारखं आहे, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं होतं. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यात आणि मनोज जरांगे यांच्या शाब्दिक चकमक झालेली दिसली.

याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना धारेवर धरलं आहे. मनोज जरांगे यांना सर्व प्रकारचं आरक्षण पाहिजे, ते पण त्यांना त्यांच्याच पद्धतीने हवं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Chhagan Bhujbal commented on Maratha reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “मनोज जरांगे यांना सर्व प्रकारचं आरक्षण हवं आहे. हे आरक्षण त्यांना ते म्हणतील त्याच प्रकारे पाहिजे आहे.

सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांचा समावेश ओबीसीमध्ये होईल. त्यानंतर त्यांना शिक्षण, नोकरी, राजकारणात अधिकार मिळतील. जवळपास 374 जाती आहे. त्यात ही मंडळी आली तर कुणालाच काही मिळणार नाही. यानंतर ओबीसी तर संपेलच.”

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठ्यांनी केली आहे. तर मराठ्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

आम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ देणार नाही. सरकारने जर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा ओबीसी समाजाने दिला आहे. या सर्व घडामोडीनंतर राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय भूमिका मांडेल? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही