Share

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? आज होणार निवडणूक आयोगासमोर सुनावणी

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार गट दोघांनीही पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा? याबाबत आज सुनावणी होणार आहे. त्यामुळं या … Read more

Published On: 

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार गट दोघांनीही पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा? याबाबत आज सुनावणी होणार आहे. त्यामुळं या सुनावणीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं  लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा? याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. दुपारी चार वाजता ही सुनावणी होणार आहे.

शरद पवार गटाकडून या सुनावणीला स्वतः शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.

अजित पवार गटाकडून या सुनावणीला कोणीही उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात आहे. अशात ही सुनावणी नेमकी कुणाच्या बाजूने होणार? याबाबत आता राज्याच्या  राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने मागील महिन्यात झालेल्या सुनावणी दरम्यान केला होता.

त्याचबरोबर अजित पवार गट सुनावणी लवकर संपवण्यासाठी घाई करत असल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना चांगलंच फटकारलं होतं.

Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister after joining the state government

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवारांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होताचं अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही