Hasan Mushrif | मंत्र्यांमध्ये वाद सुरू असल्याचं संजय राऊतांनी सिद्ध केलं तर राजीनामा देऊ – हसन मुश्रीफ

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Hasan Mushrif | मुंबई: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही, अशी भूमिका ओबीसी समाजाने स्पष्ट केली आहे. अशात या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध झाल्याचं दिसून आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. मराठा विरुद्ध ओबीसी या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गॅंगवॉर सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

There was no controversy in the cabinet meeting – Hasan Mushrif

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, “कॅबिनेट बैठकीमध्ये कोणताही वाद झालेला नाही. बाहेर चुकीची माहिती आलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्या मंत्र्यांनी (Hasan Mushrif) संयमाने बोलावं, अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मंत्र्यांमध्ये (Hasan Mushrif) वाद झाले, ते एकमेकांवर धावून गेले, हे जर संजय राऊत यांनी सिद्ध करून दाखवलं तर आम्ही (Hasan Mushrif) मंत्रीपदाचा राजीनामा देऊन.”

दरम्यान, आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोणी जुमानत नाही. भाजप देखील त्यांना जुमानत नाही.

कॅबिनेटमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा या मुद्द्यावरून गॅंगवॉर सुरू आहे. या विषयावरून कॅबिनेटमध्ये टोळी युद्ध सुरू आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्राच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात या प्रकारची स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. या परिस्थितीवर मुख्यमंत्री शिंदे जर नियंत्रण ठेवू शकत नसतील तर मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून बसण्याचा अधिकार त्यांना नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe