🕒 1 min read
Maratha Reservation | हिंगोली: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे.
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी राज्यात अनेक युवक आत्महत्या करताना दिसले आहे. अशात मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलून नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा तरुणांना केलं आहे.
तरी देखील आत्महत्येचं सत्र सुरूच असल्याचं दिसून आलं आहे. हिंगोलीमध्ये एका 27 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या केली आहे.
Youth committed suicide for Maratha reservation
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी अनेक मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहे. अशात हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील आजरसोंडा या गावात एका 27 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपला जीव दिला आहे.
आदिनाथ राखुंडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मी मराठा समाजात जन्माला आलो आहे, हा माझा गुन्हा आहे का? उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही, असं या तरुणाने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. घरातील विजेच्या तारांना पकडून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने (Maratha Reservation) केली आहे.
मराठ्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यासह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणं म्हणजे मागच्या दाराने आरक्षण (Maratha Reservation) देण्यासारखं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाजाने त्यांना धारेवर धरलं होतं. अशात छगन भुजबळ यांच्या या विधानानंतर मराठा समाज आक्रमक झालेला असून या मराठा तरुणाने त्यामुळं आत्महत्या केली असल्याच्या चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- Hasan Mushrif | मंत्र्यांमध्ये वाद सुरू असल्याचं संजय राऊतांनी सिद्ध केलं तर राजीनामा देऊ – हसन मुश्रीफ
- Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? आज होणार निवडणूक आयोगासमोर सुनावणी
- Manoj Jarange | मराठ्यांना आरक्षण मिळणार? मनोज जरांगे 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
- Sanjay Raut | ओबीसी विरुद्ध मराठा या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू – संजय राऊत
- Uddhav Thackeray | देशाची अखंडता धोक्यात अन् राज्यकर्ते निवडणुकांच्या प्रचारात मशगूल; ठाकरे गटाची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










