Share

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल? पाहा अपडेट

🕒 1 min read PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. कोट्यावधी शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळवला आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकरी बांधवांना वर्षभरात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. … Read more

Published On: 

🕒 1 min read

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे.

कोट्यावधी शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळवला आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकरी बांधवांना वर्षभरात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते.

दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. या योजनेचे (PM Kisan Yojana) आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 14 हप्ते मिळाले आहे. अशात शेतकरी आता या योजनेतील 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.

प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana)  15 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे. अशात या योजनेचा पंधरावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर 12 नोव्हेंबर रोजी पाठवला जाऊ शकतो.

परंतु, केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 15 वा हप्ता कधी जारी केला जाईल? याबाबत अपडेट मिळवण्यासाठी शेतकरी पीएम किसान योजनेच्या पोर्टलला भेट देऊ शकतात.

त्याचबरोबर या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे.

PM Kisan Yojana Helpline No

दरम्यान, तुम्ही अजून पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in/) जाऊन तुम्ही यासाठी नोंदणी करू शकतात.

त्याचबरोबर या योजनेची संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकवर संपर्क साधू शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही