Kisan Credit Card | किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे? जाणून घ्या सविस्तर

Kisan Credit Card | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते.

संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी सरकार या योजना सुरू करते. अशात सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड विकास ( Kisan Credit Card ) योजना सुरू केली आहे.

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी कमी व्याजदरात कर्ज मिळवू शकतात. शेतकरी सहज हे कार्ड  ( Kisan Credit Card ) मिळवू शकतात.

How to get Kisan Credit Card?

किसान क्रेडिट कार्ड  ( Kisan Credit Card ) तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मिळवू शकतात. ऑफलाईन किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँक शाखेत जाऊन त्यासाठी अर्ज करावा लागेल.

1 ऑक्टोबर 2023 पासून तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी  ( Kisan Credit Card ) डिजिटल अर्ज करू शकतात. किसान क्रेडिट कार्ड डिजिटल झाल्यामुळे शेतकऱ्यांना हे कार्ड मिळवण्यासाठी घराबाहेर जाण्याची गरज भासत नाही.

घरी बसूनच तुम्ही हे कार्ड मिळवू शकतात. या कार्डसाठी तुम्ही अर्ज केल्यावर 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

यासाठी अर्ज करत असताना तुम्हाला आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जमिनीची कागदपत्रे, पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती आणि शिधापत्रिका इत्यादी कागदपत्रांची गरज आहे.

तुमच्याकडे जर हे सर्व कागदपत्र असतील तर तुम्ही आजच ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने या कार्डसाठी अर्ज करू शकतात.

एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा इत्यादी बँकांना भेट देऊन तुम्ही या क्रेडिट कार्डसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

त्याचबरोबर तुम्ही संबंधित बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

दरम्यान, अतिवृष्टी, पूर, वादळ इत्यादींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरं जावं लागते. अशात शेतकऱ्यांना कर्ज काढून शेतीची काम भागवावी लागतात.

त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड योजना  ( Kisan Credit Card )  घेऊन आली आहे.

किसान क्रेडिट कार्डच्या  ( Kisan Credit Card ) माध्यमातून शेतकरी सहजपणे तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

18 ते 75 वर्षे वय असणारे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊन शकतात. त्याचबरोबर हे कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान दोन एकर शेती असणं अनिवार्य आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.