Ajit Pawar | मनोज जरांगे यांच्यासह कुणीही भडकाऊ भाषण करू नये – अजित पवार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | पुणे: राज्यामध्ये मराठा समाजासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आंदोलन करत आहे. त्यांनी केलेल्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे.

यानंतर मनोज जरांगे आणि छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal  ) राज्यामध्ये सभा घेताना दिसत आहे. या सभांमध्ये बोलत असताना दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.

यानंतर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांच्यासह कुणीही भडकाऊ भाषण करू नये, असं असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Everyone should express their opinion – Ajit Pawar

पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, “मनोज जरांगे यांच्यासह कुणीही भडकाऊ भाषण करू नये.  भाषणामध्ये काय शब्द वापरायला हवे? हे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही बघायला हवं.

प्रत्येकाने आपलं मत मांडायला हवं. परंतु, ते मांडत असताना समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, अशी माझी ( Ajit Pawar ) सर्वांना विनंती आहे. ही गोष्ट मी ( Ajit Pawar ) कोणाचाही नाव घेऊन सांगत नाही. हे माझं ( Ajit Pawar ) सर्वांना आवाहन आहे.”

दरम्यान, राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे.

त्यानंतर छगन भुजबळ यांनी राज्यामध्ये जागोजागी ओबीसी एल्गार मेळावे घेतले आहे. या मेळाव्यांमध्ये बोलत असताना त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर खालच्या स्तराला जाऊन टीका केली आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी देखील भुजबळांना सडेतोड उत्तर देत त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला. या सर्व घडामोडीनंतर राज्य शासन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या