Vijay Wadettiwar | जिथे निवडणुका तिथे लुटमार, हा भाजपचा नवीन धंदा – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: राजस्थानमध्ये निवडणुकांचं सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष राजस्थानमध्ये निवडून येण्यासाठी भव्य प्रचार सभा घेताना दिसत आहे.

राजस्थानमध्ये प्रचार करण्यासाठी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते राजस्थानमध्ये दाखल झाले आहे. या प्रचारादरम्यान भाजपने राजस्थानमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 450 रुपयात देण्याचा वादा केला आहे.

यावरून विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. जिथे निवडणुका तिथे लुटमार, हा भाजपचा नवीन धंदा असल्याचं विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar )  म्हणाले, “भाजपा गाजर देणाऱ्यांचा पक्ष. जिथे निवडणुका तिथे खैरात वाटायची, जिथे निवडणुका नाही तिथे लुटमार करायची, हा धंदाच भाजपने सुरू केलंय.

राजस्थान निवडणुकीत ४५० रुपयात सिलेंडर देण्याचे गाजर भाजपने मतदारांना दाखवले आहे.पण त्याच सिलेंडरकरीता महाराष्ट्रातील जनतेकडून भाजप १००० रुपये मोजून घेत आहे.”

पुढे ते ( Vijay Wadettiwar ) म्हणतात, “राजस्थान मध्ये सत्ता पाहिजे म्हणून खटाटोप सुरू आहे मग महाराष्ट्रात महायुती सरकार कसली वाट बघत आहे?

खोटं बोलण्यात आणि गाजर देण्यात भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळेच प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांना जनतेचे टोमणे प्रसाद म्हणून मुकाटपणे खावे लागतात.”

When will the people of Maharashtra get a gas cylinder for Rs 450?

दरम्यान, या मुद्द्यावरून माजी केंद्रीय मंत्री विकास मुत्तेमवार यांनी देखील भारतीय जनता पक्षाला धारेवर धरलं आहे. “राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने घरगुती गॅस सिलेंडर 450 रुपयात देण्याचा वादा केला आहे.

मात्र, महाराष्ट्रात भाजपची सत्ता असून 450 रुपयात गॅस सिलेंडर का मिळत नाही? महाराष्ट्रातील जनतेला 450 रुपयात गॅस सिलेंडर कधी मिळेल?”, असा सवाल विकास मुत्तेमवार यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.