Bacchu Kadu | मराठा आरक्षणाबाबत अजित पवार आणि छगन भुजबळांची भूमिका एकच – बच्चू कडू

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे.

यासाठी त्यांचं राज्यामध्ये आंदोलन देखील सुरू आहे. अशात त्यांच्या या मागणीला छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी विरोध दर्शवला आहे.  त्यानंतर मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आला आहे.

या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ एकमेकांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका करताना दिसले.  याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार ( Ajit Pawar ) आणि छगन भुजबळ यांची भूमिका एकच आहे, असं बच्चू कडू ( Bacchu Kadu )  यांनी म्हटलं आहे. त्यांच्या ( Bacchu Kadu ) या वक्तव्यानंतर अजित पवारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Chhagan Bhujbal cannot speak without the support of seniors – Bacchu Kadu

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना बच्चू कडू ( Bacchu Kadu ) म्हणाले, “वरिष्ठांच्या पाठिंब्याशिवाय छगन भुजबळ बोलू शकत नाही. यावरून अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भूमिका एकच आहे, हे स्पष्ट होतंय.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस ओबीसीचं नेतृत्व करू पाहत आहे. परंतु, छगन भुजबळ या दोन्ही पक्षांना भारी पडत आहे. छगन भुजबळ यांनी या दोन्ही पक्षांना मागं टाकलं आहे. ना भाजप ना काँग्रेस. छगन भुजबळ ओबीसींचे नेते आहे.”

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. राज्य शासनाने मराठ्यांना तोपर्यंत आरक्षण दिलं नाही तर राज्यामध्ये मोठं आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

अशात मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यानंतर दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे.

अशात बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांच्या विधानानंतर अजित पवार छगन भुजबळ यांना पाठिंबा देत असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यानंतर राज्य सरकार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.