Nitesh Rane | डिक्शनरीमध्ये पनौतीचा अर्थ संजय राजाराम राऊत लिहावा लागेल – नितेश राणे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात सध्या ‘पनौती’ हा शब्द चर्चेत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी या शब्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.

त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यावर या शब्दावरून टीकास्त्र चालवलं आहे.

यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. डिक्शनरीमध्ये पनौतीचा अर्थ संजय राजाराम राऊत लिहावा लागेल, असं नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी म्हटलं आहे.

What happened to Uddhav Thackeray? – Nitesh Rane

नितेश राणे ( Nitesh Rane ) म्हणाले, “डिक्शनरीमध्ये पनौतीचा अर्थ संजय राजाराम राऊत लिहावा लागेल. हा चपट्या पायाचा माणूस जिथे जिथे जातो, तो पक्ष संपतो.

हा माणूस उद्धव ठाकरे यांना चिटकला. त्यानंतर उद्धव ठाकरेंची काय अवस्था झाली? हे एकदा बघा. ना घर का ना घाट का, अशी त्यांची अवस्था झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या हातात ना पक्ष राहिला ना त्यांचं घर व्यवस्थित चालत आहे. तेच शरद पवार यांचं देखील झालं आहे. संजय राऊत शरद पवारांसोबत गेले आणि त्यांचं काय झालं? ते बघा.

संजय राऊत यांच्या घरचे त्यांना किती मोठी पनौती मानतात, याबाबत जर माहिती बाहेर आली तर संजय राऊत कुणाला तोंड दाखवू शकणार नाही.

काही वर्षांपूर्वी एक्सप्रेस टॉवरच्या बाथरूममध्ये काय घडलं? याबाबत माहिती बाहेर आली तर संजय राऊत यांना किती मोठी पनौती म्हणावं लागेल.”

दरम्यान, संजय राऊत यांनी पनौती या शब्दावरून सत्ताधारी पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. “ज्यांना राज्यामध्ये पनौती समजलं जातं ते राज्याच्या बाहेर जाऊन प्रचार करतात.

कारण राज्यामध्ये त्यांना कोणी विचारत नाही. म्हणून ते राजस्थानला जाऊन स्वतःची पिंपी वाजवत आहे. तिकडे ते प्रचारासाठी खोके घेऊन गेले असतील. राज्यात काय सुरू आहे? हे भाजपला माहित नाही. मात्र राज्यात त्यांची काय औकात आहे? हे त्यांना माहित आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या