Sanjay Raut | बावनकुळेंच्या अडचणीत होणार वाढ? पिक्चर अभी बाकी है म्हणतं राऊतांनी केला मकाऊतील व्हिडिओ शेअर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) मकाऊला गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी त्यांना धारेवर धरलं आहे.

कारण संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी एक फोटो ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. या फोटोच्या माध्यमातून संजय राऊत यांनी बावनकुळे कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला आहे.

परंतु, बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Sanjay Raut shared a new video from Macau

संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये जाऊन कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मकाऊतील नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. “मकाऊमध्ये एक संध्याकाळ, पिक्चर अभी बाकी है”, असं म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये आजूबाजूला टेबल खुर्चीवर लोक बसलेले दिसत आहे. मात्र, संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय म्हणायचं आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

परंतु, या व्हिडिओनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाहा व्हिडिओ (Watch the video)

https://x.com/rautsanjay61/status/1727916865224360060?s=20

दरम्यान, संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो शेअर करत ते मकाऊमध्ये कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला होता.

संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. “संजय राऊत यांनी केलेल्या पोस्टच्या माध्यमातून त्यांची विकृत मानसिकता दिसून येत आहे.

मकाऊमध्ये चंद्रशेखर बावनकुळे सहकुटुंब गेले होते. त्या ठिकाणी ते ज्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते, त्याच्या बाजूला कॅसिन आहे.

जाणीवपूर्वक संजय राऊत यांनी अर्धा फोटो ट्विट केला आहे. त्यांनी जर पूर्ण फोटो ट्विट केला असता तर त्या फोटोत बावनकुळे सहकुटुंब दिसले असते”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या