Sanjay Raut | महाराष्ट्रात ज्यांना पनौती समजलं जातं, ते बाहेर जाऊन प्रचार करतात; राऊतांनी CM शिंदेंना डिवचलं

Sanjay Raut | मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) सध्या राजस्थान दौऱ्यावर आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये प्रचार सभा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे तिकडे गेले आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

महाराष्ट्रात ज्यांना पनौती समजलं जातं, ते बाहेर जाऊन प्रचार करतात, असं म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी एकनाथ शिंदे यांना धारेवर धरलं आहे.

No one asks them in the state – Sanjay Raut

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “राज्यात काय सुरू आहे? हे भारतीय जनता पक्षाला माहित नाही.

महाराष्ट्रात त्यांची काय औकात आहे? हे त्यांना माहित आहे. राज्यात त्यांना कोणी विचारत नाही. त्यामुळे ते राजस्थानमध्ये जाऊन स्वतःची पिंपी वाजवत आहे. ते तिकडे प्रचाराला खोके घेऊन गेले असतील.

महाराष्ट्रामध्ये ज्यांना पनौती समजलं जातं, ते महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन हिंदुत्वाचा प्रचार करत आहे. कारण राज्यात त्यांना कोणी विचारत नाही.

या देशामध्ये दोनच हिंदुहृदयसम्राट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले आणि बाळासाहेब ठाकरे हे दुसरे. या दोघांव्यतिरिक्त बाकी कुणीही हिंदुहृदयसम्राट नाही.”

यावेळी बोलत असताना संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्याबद्दल देखील मोठा दावा केला आहे.

ते ( Sanjay Raut ) म्हणाले, “हे गट भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होणार आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपमध्ये सामील होऊन आगामी निवडणुका कमाल चिन्हावर लढवणार आहे.

त्यामुळे त्यांनी कितीही पदव्या लावून घेतल्या तरी काहीही उपयोग नाही. 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने अनेक नेते दुसऱ्याच्या पक्षातून घेतले आहे. परंतु, हे सर्व तात्पुरतं आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.