Marathi Board | दुकानावर मराठी पाटी नाही? तर मग भरा प्रतिकामगार 2 हजार रुपये

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Marathi Board | टीम महाराष्ट्र देशा: सर्वोच्च न्यायालयाने मुंबई शहरातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती.

शनिवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी ही मुदत समाप्त होणार आहे. यानंतर मुंबई महानगरपालिका यासंदर्भात ( Marathi Board ) कारवाईला सुरुवात करणार आहे.

ज्या दुकानावर मराठी पाटी ( Marathi Board ) दिसणार नाही त्या दुकानदाराकडून मुंबई महानगरपालिका दंड वसूल करणार आहे. या दुकानदाराकडून प्रतिकर्मचारी 2 हजार रुपये दंड घेतला जाणार आहे.

It has been made compulsory to have Marathi boards in the shops

मुंबईतील दुकानांवर मराठी पाटी ( Marathi Board ) असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी दुकानदारांना मुदत देखील देण्यात आली होती.

यानंतर सुमारे सात लाख दुकानांपैकी फक्त 28 हजार दुकानांवर मराठी नामफलक ( Marathi Board )  झळकले आहे. यानंतर मराठी पाटी नसेल तर नोटीस न देता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

दुकानदाराने मराठी पाटी ( Marathi Board ) लावण्यास नकार दिल्यास न्यायालयीन खटला दाखल केला जाईल. त्या दुकानदाराला न्यायालयीन खटला नको असल्यास दंड भरावा लागेल.

दुकानांवर मराठी नामफलक ( Marathi Board ) लावण्याची कार्यवाही होत आहे की नाही याची तपासणी पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वार्डात केली जाणार आहे.

दरम्यान, 2022 मध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दुकानावर मराठीत पाटी ( Marathi Board ) लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

2018 मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दहा किंवा दहा पेक्षा अधिक कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाटी ( Marathi Board ) असणे अनिवार्य होतं. मात्र, त्यानंतर नव्या नियमानुसार कर्मचारी संख्या कितीही असली तरी दुकानावर मराठी पाटी ( Marathi Board ) असणं बंधनकारक आहे.

महत्वाच्या बातम्या