Eknath Shinde | CM शिंदे शेतकऱ्यांना न्याय देणार? शेतकऱ्यांनी काढले अवयव विक्रीला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | हिंगोली: यंदा राज्यामध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले अवयव विक्रीला काढले आहे. या शेतकऱ्यांनी आपली किडनी डोळे, यकृत, विक्रीला काढले आहे. या शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना निवेदन पाठवलं आहे.

Farmers in Hingoli put their organs on sale

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले अवयव विक्रीला काढले आहे. “दोन-चार पोतं सोयाबीन आमच्या पदरात पडलं आहे. मात्र, त्या सोयाबीनला भाव नाही.

आम्ही आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहोत. सरकार आम्हाला पिक विमा द्यायला तयार नाही. म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )  यांना तहसीलदारामार्फत निवेदन दिलं आहे.

मुख्यमंत्री साहेब ( Eknath Shinde ) आमची डोळे, किडनी आणि लिव्हर विकत घ्या आणि आम्हाला कर्ज फेडण्यासाठी पैसे द्या”, असं एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना ( Eknath Shinde ) म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “किडनी – ७५,०००/ १० नग, लिव्हर – ९०,०००/ १० नग, डोळे – २५,०००/ १० नग यासह शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही.

हेच शेतकरी जर आमदार खासदार असते तर त्यांच्याकरीता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही.

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे.”

महत्वाच्या बातम्या