Sanjay Raut | एकनाथ शिंदे मोठे नेते, त्यांच्या अमेरिकेत सभा लावल्या पाहिजे – संजय राऊत

Sanjay Raut | नाशिक: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) राजस्थान दौऱ्यावर आहे.

राजस्थानमध्ये प्रचार सभा घेण्यासाठी मुख्यमंत्री तिकडे गेले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरलं आहे. एकनाथ शिंदे मोठे नेते आहे, त्यांच्या अमेरिकेत सभा लावल्या पाहिजे, असं संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde will be invited to France – Sanjay Raut

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जयपूरमध्ये प्रचार करू द्या. पुढच्या वर्षी अमेरिकेच्या निवडणुका आहे. त्यानंतर युरोपमधील सात राष्ट्राच्या निवडणुका होणार आहे.

एकनाथ शिंदे एवढे मजबूत नेते आहे की त्यांच्या अमेरिकेमध्ये सभा लावल्या जाणार आहे. अमेरिकेसह फ्रान्समध्ये देखील लवकरच निवडणुका होणार आहे. फ्रान्समध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावण्यात येईल.

महाराष्ट्रामध्ये आधी महानगरपालिका निवडणुका घेऊन दाखवा. या निवडणुकांचा प्रचार करून दाखवा. ते पुण्यातील लोकसभेची पोटनिवडणूक घ्यायला तयार नाही आणि ते जयपूरला निवडणुकांचा प्रचार करायला जात आहे.”

यावेळी बोलत असताना संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी अजित पवार गट आणि शिंदे गटावर देखील शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

ते ( Sanjay Raut ) म्हणाले, “माझ्या माहितीनुसार अजित पवार गटाचे बहुतांश आमदार आणि खासदार भाजपात प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर शिंदे गटातील सर्व आमदार भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार आहे.

भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर ते सर्व नेते कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालं असलं तरी त्यांना त्या चिन्हावर कोणीच मतदान करणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.