Chhagan Bhujbal | नाशिकमधून मी निवडून येणार आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – छगन भुजबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | मुंबई: सध्या राज्यातील वातावरण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलं तापलेलं आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

यानंतर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) एकमेकांवर टीका-टिपणी करताना दिसले आहे.

याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) राज्यामध्ये जागोजागी मेळावे घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात मनोज जरांगे यांच्या जाहीर सभा पार पडत आहे.

अशात नाशिक जिल्ह्यात मनोज जरांगे यांची सभा झाली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

येवल्यात कसा निवडून येतो बघतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. यावर छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

I will be elected – Chhagan Bhujbal

छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, “आमदार आणि मंत्रीपद तेवढंच आहे का? खड्ड्यात गेलं हे सगळं. आयुष्यात काय एवढंच आहे का?

नाशिकमधून मी निवडून येणार आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मला कुणी पाडायला आलं तर मी अनेकांना पाडेल. ( Chhagan Bhujbal ) मी निवडून येणार आहे.”

दरम्यान, मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. यानंतर दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“दोन समाजामध्ये होणारा वाद आपल्याला थांबवायचा आहे. हा वाद थांबवायचा असेल तर आपल्याला वारकरी संप्रदायाचं व्हावं लागेल.

प्रत्येक समाजाचे प्रश्न असतात आणि हे प्रश्न मांडायला देखील हवे. परंतु, हे प्रश्न सोडवत असताना दुसऱ्याच्या समाजाबद्दल अपशब्द आणि आकस नको”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या