Manoj Jarange | फडणवीसांनी छगन भुजबळांना थांबवावं – मनोज जरांगे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | अहमदनगर: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्याच्या समाजाबद्दल अपशब्द आणि आकस नको, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

If someone speaks to us, we will not leave him – Manoj Jarange

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असं आम्ही ( Manoj Jarange ) काहीच बोललेलो नाही.

परंतु, आम्हाला जर कोणी बोललं, तर आम्ही त्याला उत्तर द्यायचं नाही का? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या माणसांना थांबवायला हवं.

जातीय तेढ निर्माण होईल असं, काही त्यांना बोलू देऊ नका. त्यानंतर आम्ही देखील थांबू. आम्हाला ( Manoj Jarange ) जर कोणी बोललं तर आम्ही त्याला सोडणार नाही.”

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दोन समाजामध्ये निर्माण होणारी तेढ आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला वारकरी संप्रदायाचं व्हावं लागेल.

राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे विविध प्रश्न आहे. हे प्रश्न मांडले गेले पाहिजे. मात्र, हे प्रश्न मांडताना दुसऱ्याच्या समाजाबद्दल अपशब्द आणि आकस नको. त्याउलट त्यांनी आपलं म्हणणं आग्रही पद्धतीने मांडायला हवं.”

महत्वाच्या बातम्या