Rohit Pawar | जनतेची व्यथा समजण्यासाठी सोन्याचा चमचा नाही तर प्रामाणिकपणा आणि संवेदना गरजेच्या; रोहित पवारांचं CM शिंदेंना प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर खोचक टीका केली होती. काही लोकांना आमचा हा कार्यक्रम इव्हेंट दिसतो.

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय दिसणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जनतेची व्यथा समजण्यासाठी सोन्याचा चमचा नाही तर प्रामाणिकपणा आणि संवेदना गरजेच्या आहे, असं रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Government does not reach people’s door – Rohit Pawar

ट्विट करत रोहित पवार ( Rohit Pawar )  म्हणाले, “आदरणीय मुख्यमंत्री साहेब, या आहेत गोदाबाई, युवा संघर्ष यात्रा गेवराई तालुक्यातील जातेगावातून जात असताना गोदाबाई यांची भेट झाली.त्यांच्या मुलाच्या ह्रदयाला होल आहे मुलाचं ऑपरेशन कसं करायचा याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

त्याचे घर देखील पत्र्याचे आहे,पक्के घर नाही. गॅस आहे पण गॅस भरायला परवडत नाही म्हणून,गॅस कोपऱ्यात फेकून चुलीवर स्वयंपाक करतात.टॉयलेट बांधला पण टाकी बांधली नाही, टॉयलेटचे अनुदान कोणीच परस्पर काढून नेले.”

पुढे ते ( Rohit Pawar ) म्हणतात, “सर्वात दुःखद म्हणजे दूध घ्यायला परवडत नाही म्हणून त्या नातवंडांना बिना दुधाच्या चहा मध्ये पाव खायला देतात.या माउलीच्या अशा एक ना अनेक प्रश्नांनी माझ्यासह उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं.

साहेब, शासन आपल्या दारीचे मोठमोठे कार्यक्रम – इव्हेंट करून ,योजनेत ‘आपल्या दारी’नाव असेल म्हणजे शासन लोकांच्या दारी पोहचत नसते.”

“साहेब, व्यथा समजून घेण्यासाठी सोन्याचा चमचा घेऊन जन्मने अथवा साधा चमचा घेऊन जन्मने याचा काही संबंध नसतो,तर लोकांच्या व्यथा समजण्यासाठी केवळ प्रामाणिकपणा आणि संवेदना गरजेच्या असतात.

तो प्रामाणिकपणा आणि व्यथा आपल्या कडे देखील असतीलच असे समजून गोदाबाईच्या कुटुंबाच्या व्यथा आपण सोडवाव्यात ही विनंती करतो”, असही त्यांनी ( Rohit Pawar ) आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या