Rohit Sharma | वर्ल्ड कप पराभवानंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये; रोहित शर्मा कर्णधार पद सोडणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये हा अंतिम सामना झाला होता. ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला या सामन्यात पराभूत केले आहे.

या स्पर्धेमध्ये भारतीय संघ रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली उतरला होता. या पराभवानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि बीसीसीआय यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कर्णधाराला ( Rohit Sharma ) अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत.

T20 World Cup will be held next year

वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा हरल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि बीसीसीआयमध्ये लवकरच बैठक होणार आहे.

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना भेटायला जाणार आहे. या भेटीदरम्यान पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार दुसऱ्याला बनवण्यास मला कोणत्याही प्रकारची अडचण नाही, असं रोहित शर्माने ( Rohit Sharma ) म्हटलं असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं.

या माहितीनंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) भारतीय संघाचं कर्णधार पद सोडणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, क्रिकेट चाहते आगामी टी-20 वर्ल्ड कपसह आयपीएल 2024 ची आतुरतेने वाट बघत आहे. आयपीएल 2024 पूर्वी लखनऊ सुपर जायंट्स या संघाला दोन धक्के बसले आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी संघ सोडला आहे. त्याचबरोबर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

येत्या आयपीएल हंगामामध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघ सोडल्यानंतर गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे.

महत्वाच्या बातम्या