Bageshwar Dham | बागेश्वर बाबांना आली उपरती; तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधानाबद्दल मागितली माफी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bageshwar Dham | टीम महाराष्ट्र देशा: धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं.

संत तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना रोज काठीने मारायची, असं त्यांनी ( Bageshwar Dham ) म्हटलं होतं. त्यानंतर बागेश्वर बाबांना मोठ्या प्रमाणात लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

त्यामुळे त्यांनी ( Bageshwar Dham ) व्हिडिओच्या माध्यमातून जनतेची मागणी माफी मागितली होती. या सर्व घडामोडीनंतर आज बागेश्वर बाबा ( Bageshwar Dham ) देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी या विधानासाठी माफी मागितली आहे.

I read an article – Bageshwar Dham

धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम ( Bageshwar Dham ) आज पुणे शहरात आहे. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी देहूमध्ये असणाऱ्या संत तुकाराम महाराज पादुकांचे दर्शन घेतले.

यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी ( Bageshwar Dham ) संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानासाठी माफी मागितली आहे.

ते  ( Bageshwar Dham ) म्हणाले, मी एक लेख वाचला होता. त्या लेखाच्या आधारावर मी हे वक्तव्य केलं होतं. यापूर्वी देखील मी महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे.

त्यामुळे मी आजपर्यंत संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल जेवढं वाचायला मिळेल, तेवढं वाचलेलं आहे. मी आजपर्यंत कधीच कोणत्या संताबद्दल बोललेलो नाही.  मी केलेलं विधान माझ्या वाचनात आलं होतं. मात्र, बोली भाषेमध्ये बोलत असताना मी चुकीचं बोललो.

माझ्या या वक्तव्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या भक्तांना आणि वारकरी संप्रदायातील लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली, याची जाणीव होताच मी व्हिडिओच्या माध्यमातून तात्काळ माफी मागितली. एखादा व्यक्ती एखाद्या संताचा विरोध करत असेल तर तो त्या संताचा भक्त असू शकत नाही. ”

महत्वाच्या बातम्या