Gautam Gambhir | गौतम गंभीरने सोडली लखनऊची साथ; आयपीएल 2024 मध्ये धरणार KKR चा हात

Gautam Gambhir | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या येत्या हंगामाची क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट बघत आहे.

आयपीएलच्या गेल्या दोन हंगामामध्ये लखनऊ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) या संघाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.

मात्र, या संघाला आयपीएल 2024 पूर्वी दोन मोठे झटके बसले आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी संघाची साथ सोडली आहे.

तर दुसरीकडे संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

Kolkata Knight Riders will be led by Shreyas Iyer in IPL 2024

आयपीएल 2024 पूर्वी गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा दिला आहे.

येत्या आयपीएल हंगामामध्ये तो ( Gautam Gambhir ) कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) चा मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे.

आयपीएल 2024 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहेत. तर या संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आहेत. श्रेयस अय्यर, चंद्रकांत पंडित, गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली केकेआर आयपीएल 2024 मध्ये उतरणार आहे.

IPL 2024: Gautam Gambhir Returns to KKR as a Mentor

दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्स संघ सोडल्यानंतर गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

“लखनऊ सुपर जायंट्ससोबत माझा प्रवास संपत असल्याची घोषणा मी करत आहे. या संघातील खेळाडू, प्रशिक्षक, स्टाफ, सर्वांप्रति मी  माझी कृतज्ञता व्यक्त करत आहे. डॉ. संजीव गोएंका यांनी माझ्या प्रयत्नांना दिलेल्या पाठिंबासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

लखनऊ सुपर जायंट्स भविष्यामध्ये अत्यंत चांगली कामगिरी करेल, त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या चाहत्यांना अभिमान वाटेल. संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”, असं त्याने ( Gautam Gambhir ) या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.