Bacchu Kadu | मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? बच्चू कडू घेणार CM शिंदेंची भेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करत आहे. यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

राज्य सरकारने 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं  नाही तर मोठं आंदोलन उभं करू असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान ते ( Bacchu Kadu ) मुख्यमंत्र्यांशी मराठा आरक्षणावर चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे.

Bacchu Kadu will meet CM Eknath Shinde today

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजस्थान दौऱ्यावर गेले नाही तर आज मी ( Bacchu Kadu ) त्यांना भेटणार आहे. एक कार्यकर्ता म्हणून आम्ही मध्यस्थी करण्यासाठी गेलो होतो. यापुढे आंदोलन होऊ नये, याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.

त्यामुळे मनोज जरांगे यांनी दिलेल्या मुदतीमध्ये राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढावा. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर प्रगती अहवाल सादर करावा. नाहीतर आम्हाला आंदोलनामध्ये सहभागी व्हावे लागेल”, असं बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यामध्ये उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं.

उपोषण मागे घेताचं राज्य सरकारने या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. मात्र, जरांगे यांनी मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शासनाला 2 जानेवारीपर्यंत मुदत न देता 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे.

सरकारने या वेळेत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर राज्यात मोठं आंदोलन होईल, असा इशारा जरांगे यांनी राज्य शासनाला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.

महत्वाच्या बातम्या