Rahul Gandhi | पनौती तिकडे गेला आणि भारत हरला; राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका

Rahul Gandhi | मुंबई: आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा 2023 मध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होते.

पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. पनौती तिकडे गेला आणि भारत हरला, असं म्हणत राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

Panauti was present there – Rahul Gandhi

राहुल गांधी ( Rahul Gandhi ) म्हणाले, “भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना जिंकला असता. परंतु, तिकडे पनौती उपस्थित होती.

त्या पनौतीमुळे भारतीय संघ हरला. परंतु, टीव्हीवर हे सर्व दाखवणार नाही. मात्र, जनतेला भारत का हारला? याचं कारण माहित आहे.” राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटानं देखील आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मोदींवर टीकास्त्र चालवलं आहे. “भारत विश्वचषक जिंकू शकला नाही याचे दुःख आहे, पण जिंकल्यानंतर भाजपने विश्वचषक ताब्यात घेऊन मिरवण्याची जी तयारी केली होती त्यावर मात्र पाणी पडले. 2024 ला आम्हीच जिंकू, असे सांगणाऱ्यांना मोदी स्टेडियमवरच धक्का बसला.

भारतीय संघाची कामगिरी उत्तमच होती. जगातला सर्वोत्कृष्ट संघ म्हणून भारतीय संघास मान्यता आहे. पण ‘मोदी’ स्टेडियमवर अपयश आले म्हणून खचून जाता कामा नये. खऱ्या खेळात हे व्हायचेच! मोदी स्टेडियमवर राजकारण हरले; पण क्रिकेट जिंकले”, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.