Share

Eknath Shinde | उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी पूजेला विरोध करून परंपरेमध्ये खंड पाडू नका – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | पंढरपूर: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. अशात मराठा आरक्षणावरून कार्तिकी वारीनिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेला मराठा समाजाने विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी एकादशी पूजेला विरोध करून परंपरेमध्ये खंड पडण्याचा प्रयत्न करू नका, असं एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले, “श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आषाढी आणि कार्तिकी एकादशीसाठी पंढरपुरात येतात.

कारण कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी ही महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा भाग आहे. त्यामुळे धार्मिक आणि भक्तीमय वातावरणात विरोधाचा सूर लावणं योग्य दिसत नाही.

कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांचा असतो. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी एकादशी पूजेला विरोध करून परंपरेमध्ये खंड पडण्याचा प्रयत्न करू नका.

त्याचबरोबर या पूजेला विरोध करण्याची आणि त्यामध्ये अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती नाही.” मुख्यमंत्र्यांच्या ( Eknath Shinde ) या वक्तव्यानंतर मराठा समाज ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Kartiki Ekadashi will be celebrated on November 23, 2023

दरम्यान, 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. या एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी यांच्या हस्ते पार पडते.

मात्र, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने ही पूजा नक्की कुणाच्या हस्ते होणार? हा सवाल मंदिर समिती पुढे उपस्थित झाला आहे. अशात मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करू नये, अशी भूमिका मांडली आहे.

अशात कार्तिकी एकादशीची महापूजा नक्की कुणाच्या हस्ते होणार? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

Eknath Shinde | पंढरपूर: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. अशात मराठा आरक्षणावरून कार्तिकी वारीनिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now