🕒 1 min read
Ajit Pawar | भांडारा: सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय आहे. अशात आज भंडारा येथे राज्य शासनाचा ‘शासन आपला दारी’ कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमादरम्यान मराठा आंदोलकांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे. या कार्यक्रमामध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) जनतेचं संबोधन करत असताना मराठा आंदोलकांनी बॅनर फाडत घोषणा द्यायला सुरुवात केली. आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा, अशा घोषणा मराठा आंदोलकांनी दिल्या.
The reservation given to the Maratha community should survive in the Supreme Court – Ajit Pawar
आज ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) भंडारा शहरामध्ये दाखल झाले.
या कार्यक्रमामध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) भाषण करत असताना मराठा आंदोलकांनी बॅनर फाडत गदारोळ निर्माण केला. त्यानंतर त्यांनी आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा, अशा घोषणा करत अजित पवारांची ( Ajit Pawar ) बोलती बंद केली.
“मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाचं नुकसान होऊ नये, असा प्रयत्न सरकार करत आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला देण्यात येणारं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे.
अशात काही लोक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे”, असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यामध्ये मोठा लढा सुरू केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. त्याआधी जरांगे महाराष्ट्रभर दौरे करत आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या अनेक ठिकाणी सभा होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांची ठाण्यात सभा पार पडली.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे का? – मनोज जरांगे
- Manoj Jarange | मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनी नाही, तर मग कुणी दिले? – मनोज जरांगे
- Manoj Jarange | जातीमध्ये तेढ निर्माण करणं हा भुजबळांचा विचार – मनोज जरांगे
- Manoj Jarange | 24 तारखेला नेमकं काय नियोजन आहे? मनोज जरांगे म्हणतात…
- Chhagan Bhujbal | मी एकटा पडलो नाही, संपूर्ण ओबीसी समाज माझ्या पाठीशी; भुजबळांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











