🕒 1 min read
Manoj Jarange | ठाणे: मराठा आंदोलक मनोज जरांगे राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.
तब्बल नऊ दिवस त्यांनी ( Manoj Jarange ) आपलं आमरण उपोषण सुरू ठेवलं. उपोषणाच्या 9 व्या दिवशी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी उपोषण स्थळी दाखल झालं होतं.
त्यानंतर त्यांनी केलेल्या विनंतीवरून जरांगे ( Manoj Jarange ) यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. त्यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याकडे 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.
पण, जरांगे ( Manoj Jarange ) यांनी सरकारला ही मुदत देण्यास नकार देत 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मोठं आंदोलन उभं करू, असा इशारा मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्य शासनाला दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.
What’s happening on the 24th?
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “24 तारखेला काय होणार आहे? हे आम्ही 24 तारखेला सांगू. 24 तारखेला काय होईल? याबाबत आम्ही आता सांगितलं तर आमचा कार्यक्रम उलटा-सुलटा होईल.”
मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या या वक्तव्यानंतर 24 तारखेला नेमकं काय घडणार आहे? याबाबत आता राज्यात तर्क-वितर्क लावले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठ्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे.
यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि ओबीसी नेते छगन भुजबळ राज्यामध्ये सभा घेत आहे. त्याचबरोबर यांच्या सभेदरम्यान दोन्ही समाजात तेढ निर्माण होताना दिसत आहे.
या सर्व घटनानंतर राज्य सरकार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal | मी एकटा पडलो नाही, संपूर्ण ओबीसी समाज माझ्या पाठीशी; भुजबळांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर
- Sanjay Raut | हातात सीबीआय आणि ईडी आहे, म्हणून भाजपची मर्दानगी जागी – संजय राऊत
- Chhagan Bhujbal | मी इतर लोकांप्रमाणे गाव बंदी वगैरे काही केलेली नाही; भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंना डिवचलं
- Uddhav Thackeray | ‘मोदी’ स्टेडियमवर अपयश आले म्हणून टीम इंडियाने खचून जाऊ नये; ठाकरे गटाची टीका
- Methi Benefits | बदलत्या वातावरणात मेथीचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











